Ads

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त अभिनव "फेस पेंटिंग".

सिंदेवाही :- तालुक्यातील नवरगाव येथे एड्सनियंत्रण संस्था चंद्रपूरच्या वतीने नुकताच आंतरराष्ट्रीय युवा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. The innovative "face painting" on the occasion of the International Youth.
एडसयुक्त भारत या सामाजिक विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी व समाजजागृती व्हावी या प्रामाणिक हेतूने म. रा.. एड्समुक्त भारत करण्यासाठी चा संदेश या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर रंगवून त्याचे प्रदर्शन केले. त्यामुळे चित्र आणि अभिनय या दोन्ही कलाप्रकाराना चालना देता आली आणि पाहिजे तो संदेश समाजाला देता आला. सदर स्पर्धेचे मूल्यांकन वनिता न्यालेवार आणि श्रद्धा ताजने यांनी केले. रोख रक्कम तथा प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यात साई चंद्रकांत भुरसे याला प्रथम, कु. दीप्ती रामेश्वर चांदेवार हिला द्वितीय तर कु. पल्लवी बिरा गंपलवार हिला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेनंतर झालेल्या छोटेखानी समारंभात भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव सदानंद बोरकर तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलेत. यावेळी धुमनखेडा प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ दिशा जैतवार तसेच डी आर पी लिंक वर्कर रोशन आकुलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल कामडी, प्रा.सारिका खुणे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंगेश कामडी यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment