Ads

ब्रम्हपुरीत नंदीबैल पोळ्याला पोलिसांकडून अमानवीय लाठीचार्ज ...!

ब्रम्हपुरी :-मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी काळात विविध शासकीय बंधनामुळे आपल्या सण त्योहाराला मुकलेला समाज आज भीषण अश्या महामारीतून बाहेर पडत कायद्यानुसारच मोठ्या उत्साहात आप आपले सण त्योहार साजरेकरण्याचा प्रयत्न करतोय मात्र अनावश्यक पोलिसी कारवाईने सण त्योहाराला गालबोट लागल्याचा प्रकार नंदीबैल पोळ्या दरम्यान शनिवार सायंकाळ सुमारास शहरात घडला व सर्वत्र पळापळ दिसून आली.Inhumane lathi charge by police on Nandi Bail pola festival in Bramhapuri...!
शहरातील नंदीबैल पोळ्याच्या व धार्मिक आस्थेचा ठिकाण म्हणजे बाजार चौकातील प्रसिद्ध महादेव मंदिर..! सदर ठिकाण ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनंपासून अगदी हाकेच्या अंतरावर तर ब्रम्हपुरी शहर अगदी शांत व सभ्य असल्याने कधी कुठल्याही अनौपचारिक घटनेची नोंद या पवित्र त्योहाराला स्टेशनं डायरीवर नसल्यागत जमा मात्र दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या नंदीबैल पोळ्याला शनिवार सायंकाळ सुमारास ब्रम्हपुरी पोलिसांकडून नागरिकांवर अचानकपणे झालेल्या मोठ्या लाठीचार्जने समाजमन सुन्न झाल्याचे शहरात दिसून आले आहे. दरवर्षीप्रमाणे महादेव मंदिर बाजार चौक परिसरात मोठ्या उत्साहात नंदीबैल पोळा सण साजरा केला जातो होता. ब्रह्मपुरीतील अनेक धार्मिक मंदिरातील मंडळी स्वयं: पुढाकाराने आप आपल्या प्रतिष्ठानातील नंदीबैल मोठं मोठ्या मिरवणुकीसह ढोल ताशे व डी. जे.च्या तालावर महादेव मंदिर परिसरात मोठ्या आस्थेने आणतात तर सर्वात शेवटी धूमनखेळा येथील सर्वांना परिचित असलेला अष्टविनायक गणेश मंदिर येथील नंदीबैल महादेव मंदिर इथे आणला जातो हा नंदीबैल धूमधडाक्यात महादेव मंदिरात आला मात्र परत जात असताना अचानकपणे ब्रम्हपुरी पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात मोठा लाठीचार्ज केला व उपस्थित लहान- मोठे, महिला-पुरुष, वयस्क मंडळी तसेच लहान बालकात व महिला मंडळीत मोठी पळा पळी व चेंगरा चेंगरी झाल्याने कित्तेकांना किरकोळ जखम झाली व सर्वत्र मोठी धावपळ दिसून आली सुदैवाने मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाली नाही. सदर पवित्र ठिकाणच्या मारहाणीचे अमानवीय व्हिडीओ शहरात व जिल्ह्यात सुद्धा वायरल झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहेत.

अचानकपणे पोलिसांची लाठीचार्ज करण्याची ही कारवाई अत्यंत अमानवीय असून मानवाधिकाराचे हणन करणारी असल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्रम्हपुरी शहरातील सुज्ञ नागरिक करीत आहेत तर शहरातील या अमानवीय लाठीचार्ज प्रकरणावर जिल्हा पोलीस प्रशासन काय भूमिका घेतो हे पाहणे आता ब्रम्हपुरीकरांसाठी औचित्याचे ठरणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment