Ads

भाजपा अनु. जमाती मोर्चा तर्फे राष्ट्रपती यांची प्रतिमा अधीकाऱ्यांना भेट..

चंद्रपूर- लोकनेते विकास पुरुष ना. सुधीरभाऊ यांच्या मार्गदर्शनात देशातील पहिल्या आदिवासी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु Tribal Excellency President Mrs. Draupadi Murmu यांच्या प्रतिमेचे फोटो फ्रेम चंद्रपूर येथील मा.जिल्हाधिकारी कार्यालय,मा.जिल्हा पोलीसअधिक्षक अरविंद साळवे,तहसील कार्यालय तथा आदिवासी वि. प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात जाऊन भेट देण्यात आल्या.
भाजपा अनु. जमाती मोर्चा, महानगर चंद्रपूर च्या माध्यमातून भेट देण्यात आलेल्या प्रतिमा ची भेट स्वीकारतांना सर्व अधिकारीगण कौतुकाने आभार व्यक्त करीत होते. नेहमी आदिवासी समाजाच्या प्रश्नांनाला वाचा फोडण्यासाठी सज्ज असणारे सामाजिक, शैक्षणिक आर्थिक प्रगती च्या मुख्य प्रवाहात आदिवासी समाज येण्यासाठी सदैव प्रयत्न करणारे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे महामहिम राष्ट्रपती यांच्या प्रतिमा भेट देण्या साठी आदिवासी मोर्चा, महानगर चे जिल्हा अध्यक्ष धनराज कोवे यांना सूचना केली होती.
तेव्हा सुचने प्रमाणे प्रतिमा भेट देण्या साठी मोर्चाचे पदाधिकारी महामंत्री अरविंद मडावी, महिला जिल्हाध्यक्ष सौ. रेखा मडावी,महानगर महिला अध्यक्ष कु. रंजना किंन्नाके, महिला महामंत्री सौ. गीताताई गेडाम, माजी नगरसेविका सौ. मायताई उईके, शीतल कुळमेथे, सौ सीमा मडावी, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment