Ads

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

पडोली(चंद्रपूर) :  (चंद्रपूर) जॉनलाईन रमी खोळाच्या आहारी जावून कर्जबाजारी झालेल्या एका पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीचा स्वतःच्या हातून खून झाल्याने घराशेजारील एका खोल विहीरीत मोठ्या भावाला मरणाची माहिती देवून स्वतही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरात घडली आहे. स्नेहा उले असे मृतक पत्नीचे तर सुधाकर असे पतीचे नाव आहे. कौटुंबिक कारणातून पडलेल्या घटनेत पती पत्नीचा जिव गेल्याने देवाडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या पडोली पोलिस स्टेशन हद्दीतील आणि मुळचे घुग्घुस येथील रहिवासी सुधाकर डहुले यांचे देवाडा येथील महाकाली परिसरात वास्तव्य होते. पासून ते या ठिकाणी राहून इलेक्ट्रिशियनसाय करीत होते. याच व्यवयातून मिळणाऱ्या मिळतीवर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र त्यांना ऑनलाइन रमी खेळाच्या छंद जडल्याने ते पा खेळाच्या आहारी गेले होते. यातून पती व पत्नीमध्ये अधूनमधून भांडण होत होते. वर्षभरापूर्वी आणि महिनाभरापूर्वीही त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. इलेक्ट्रिशियन व्यवसायातून मिळणारा सर्व पैसा रमी खेळात ऑनलाईन द्वारे खर्च करीत होता.

आज सोमवारी (8 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास याच कौटुंबिक वादातून पती पत्नी मध्ये भांडण झाले. काचे विकोपाला गेल्याने पती सुधाकर प्रथम पत्नी स्नेहा हिचा घरीच गळा आवळून खून केला. पत्नी जागीच मृत्यू झाल्याने त्यानेही स्वत जिवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला.Husband killed his wife and committe suicide  
त्यानंतर सुधाकरले पाने आपल्या मोठ्या भावाला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. व आपणही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर महाकाली परिसरातील स्वतच्या घराजवळील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खोल विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लगेच मोठ्या भावाने पडोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसानी घटनास्थळी येऊन सर्वप्रथम पत्नीचा रक्ताच्या पारोळ्यात पडलेला मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनाकरीता पाठविला. त्यानंतर त्याने आत्महत्या केलेल्या विहिरीचा शोध घेण्यात आता. गजानन महाराज मंदिर परिसरात खोलगट विहीर आहे. त्या ठिकाणी शोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला.

जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करून मृतदेह विहरितून काढण्याची कारवाई करण्यात आली.नंतर मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. सदर घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी याना देण्यात आली. त्यांनी घटना भेट देऊन पाहणी केली.

पोलिसाना मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा रमीच्या आहारी जावून कर्जबाजारी झाला होता. सुमारे दिस लाख रूपये त्यांनी पा रीता कर्ज केलेला होता. मोठ्या भावाने त्यापैकी बराच कर्ज चुकता केला होता. चारचार त्याला अशा खेळापासून धाबविण्याचा प्रयत्न पत्नीने केला होता. परंतु ऑनलाईन खेळाच्या आहारी गेलेला सुधाकर पत्नीचेही ऐकत नव्हता त्यामुळेच त्यांच्या भांडण होत होते. डहले कुटुंब हे मुळचे घुग्घुसचे होते. परंतु पडोली पोलिस स्टेशन हद्दीतील देवाडा गावात ते बन्याच वर्षापासून महाकाली परिसरातील भागात राहते होते. या ठिकाणी इलेक्ट्रिशीयन काम करीत होता. त्यातून मिळणान्या कमाईवर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु ऑनलाईन खेळाच्या आहार जावून कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीचा खून करून स्वताही आत्महत्या केल्याचे दोघांचेही जिव गेले आहे. पुढील तपास पडोली पोलिस पोलिस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment