Ads

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; गुराखी जखमी

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यात आज मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. यामध्ये दुधवाही येथील घटनेत एका शेतक-याचा मृत्यू झाला तर पद्मापूर येथील घटनेत एक गुराखी जखमी झाला आहे.Cowherd injured मुखरू राऊत (वय 62) रा. दूधवाही असे मृतक तर प्रभाकर धोंडू मडावी रा. पद्मापूर असे जखमी शेतक-याचे नाव आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील दुधवाही येथील शेतकरी मुखरू राऊत (वय 62) हे स्वत: च्या शेतावर धान पिकाची लागवड केली असल्याने नेहमीप्रमाणे आज मंगळवारी सकाळी शेतावर गेले होते, शेतावर धानपिकाची पहाणी करीत असताना शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतक-यावर अचानक हल्ला चढविला. यामध्ये ते जागीच ठार झाले.जखमीFarmer killed in tiger attack या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. लगेच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

ही घटना ताजी असतानाच ब्रह्मपुरी तालुक्यातीलच पद्मापूर येथे वाघाने गुराख्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. प्रभाकर धोंडू मडावी असे जखमी गुराख्याचे नाव आहे.. पद्मापूर येथील गुराखी प्रभाकर धोंडू मडावी हा गावापासून एक किलोमीटर अंतरावर जनावरे चरण्याकरीता जंगलात गेला होता. जंगलात जनावरे चारत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर अचानक हल्ला चढविला. गुराख्याने प्रचंड आरडा ओरड केल्याने वाघ भयभित होवून जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र गुराखी प्रभाकर धोंडू मडावी हा गंभीर 'जखमी झाला, त्याला तत्काळ ब्रम्हपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.. चिमूर एका कार्यक्रमाकरीता गेलेले खासदार अशोक नेते यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी माजी आमदार अतुल देशकर यांचेसह जखमीची ब्रम्हपुरी रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी दिपेश मल्होत्रा यांच्याची बैठक घेऊन वाढत्या मानव वन्यप्राणी संघर्षाबाबत चिंता दर्शवित वाघाच्या बंदोबस्ता करिता ठोस पाऊले वनविभागाने उचलावी असे निर्देश दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment