Ads

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यातील शिवनी येथील इसमाचा मृत्यू झाल्याचीtiger attack Man killed घटना आज दुपारच्या सुमारास घडली दुर्योधन जयराम ठाकरे वय 49 वर्ष राहणार शिवनी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली असे मृतक इसमाचे नाव आहे
आरमोरी तालुक्यातील शिवनी येथील दुर्योधन ठाकरे यांची शेती ही ब्रह्मपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथे आहे आज ते आपल्या वीस वर्षीय मुलगा आशिष सोबत शेतावर गेले असता मुलगा हा शेळीला चारा तोडण्याकरिता झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता झाडावर चढला होता. दुर्योधन ठाकरे हे खाली खांद्या जमा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना फडफडत नेले मुलगा बापाला वाघाने ठार केल्याचे थरारक दृश्य पाहून पूर्णतः घाबरून गेला .उत्तर वनपरिक्षेत्रा मध्ये सदरची घटना घडली असून वाघाने मृतदेह फडफडत नेल्याने मृतदेह हा दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत हद्दीमध्ये आढळून आला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले .पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

या घटनेने बेलगाम परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात शेतशिवार लागून आहे. याच परिसरात वाघाने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment