Ads

उद्यानात देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराकडून मजुरांची लूट

चंद्रपूर :- शहरातील मनपा अंतर्गत येणाऱ्या उद्यानात देखभाल करणाऱ्या कामगारांना प्रतिदिवस ५२० रुपये मजुरी देण्याची तरदूत असतानाही संबंधित ठेकेदाराकडून मागील काही वर्षांपासून पिळवणूक केली जात आहे. चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाच्या नावाखाली माजी नगरसेविकेचे पतीच पडद्यामागून ठेवा चालवीत असून, मजुरांना केवळ ३०० रुपये रोजी देऊन पिळवणूक केली जात आहे. या संदर्भात तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.Extortion of laborers by the maintenance contractor in the park
चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या उद्यानांची देखभाल करणे, पाणी टाकणे, लॉन आणि झाडाकरिता माती, कचरा साफ करणे, निंदण करणे आदी कामासाठी २०२० मध्ये चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाला कंत्राट देण्यात आले. मनुष्यबळाचा पुरवठा करून त्यांच्या कडून काम करवून घेण्याची जबाबदारी या मंडळाकडे आहे. त्यासाठी प्रतिमजूर प्रति दिवस ५२० रुपये मजुरीची तरतूद करण्यात आली. चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाचे अप्रत्यक्ष काम बाबुपेठ भागातील माजी नगरसेविकेचे पती बघतात. बहुतेक उद्यानातील कामाचे कंत्राट त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे मजूर देखील हे बाबुपेठ प्रभागातील डॉ. आंबेडकर नगरचे रहिवासी आहेत. मात्र, या कामापोटी ५२० रुपयांऐवजी केवळ ३०० रुपये दिले जात आहे, अशी तक्रार आपचे शहर सचिव राजू शंकरराव कूडे यांच्याकडे प्राप्त झाली. संबधित ठेकेदार एवढ्यावरच न थांबता लागणारे साहित्य हे सुध्दा कामगारांना स्व: खर्चाने आणायला लावत आहे. पीएफ खात्यात PF account भरावयाची रक्कम सुध्दा कमी टाकून कामगाराचे शोषण Exploitation of labour केले जात आहे. आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या 5 दिवसात पीडित कामगाराचे वेतन त्यांचा खात्यात टाका, अन्यथा संबधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कामगाराच्या हक्क अधिकार अधिनियम अंतर्गत कायदेशिर कारवाई आपतर्फे करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळेस आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, महिला अध्यक्षा ॲड सुनिता पाटील जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार शहर सचिव राजू कुडे, झोन 3 सह संयोजक अजय कुमार बाथव, झोन 3 सचिव विनोद रेब्बावार, युवा शहर संयोजक संतोष बोपचे, बाबूपेठ संयोजक अनुप तेलतुंबडे, बाबूपेठ प्रभाग सह संयोजक कृष्णाजी साहारे, महेश ननावरे, वार्ड अध्यक्ष रुपम ताकसांडे, संदीप रायपूरे, मोठया संख्येने सफाई कामगार आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment