Ads

जि.प.उच्च प्रा. शाळा बामणी दु.येथे एक भारत श्रेष्ठ भारत क्लब ची स्थापना.

चंद्रपुर :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बामणी दु.पं.स.बल्लारपूजि.चंद्रपूर येथे आज "एक भारत-श्रेष्ठ भारत "या योजनेंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत क्लब" ची स्थापना करण्यात आली इयत्ता पहिली ते सातवीच्या तीस विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
विविध राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक पद्धत तेथील सण-उत्सवांची माहिती, तेथील संगीत, कला,खाद्यसंस्कृतीची माहिती मिळावी तेथील जैवविविधता,खेळ, भाषा,राहणीमान, घरे,प्राणी या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा उद्देश या योजनेचा आहे त्यात विविध उपक्रम राबवून मुलांना अवगत करून देऊन राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे उद्दिष्ट गाठायचे ध्येय पुढे ठेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यात निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,अभिनय नाटीका व नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
मीना राजू मंच च्या सुगमकर्त्या सौ.प्रिती विलास जगझाप स.शि. जि.प.उच्च. प्राथमिक.शाळा, बामणी दु.यांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात या क्लब ची स्थापना केली
या क्लब च्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment