Ads

नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यपदी डॉ. डी. एच. गहाणे यांची नियुक्ती

ब्रम्हपुरी:-नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे कार्यकारी प्राचार्य म्हणून प्रोफेसर डॉ. धनंजय हरिभाऊ गहाणे यांची कार्यकारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या सर्वसंमतीने करण्यात आली.
नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव श्री. अशोकजी भैया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या पदग्रहण कार्यक्रमात संस्थेचे जेष्ठ सदस्य प्रा. सुभाषजी बजाज, माजी प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. एन. एस. कोकोडे यांनी प्राचार्य पदाची सूत्रे कार्यकारी प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांच्या कडे सोपवून एका जबाबदार व्यक्तीकडे ही सूत्रे सोपविल्याचे समाधान व्यक्त करीत आपल्या शुभेच्छा दिल्या. प्रा. सुभाषजी बजाज यांनी प्राचार्य पदावर आपल्या बुद्धीमान व महाविद्यालयाप्रती समर्पित विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे समाधान व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांनी सर्वांचे आभार मानून कोणताही पक्षपात न करता संस्थेच्या मार्गदर्शनाने व सर्वांच्या सहकार्याने प्रशासन चालविण्याचा मनोदय व्यक्त केला. आणि सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्रीमती स्नेहलताबाई भैया, उपाध्यक्ष अँड .प्रकाशजी भैया, सचिव श्री. अशोकजी भैया, सहसचिव अँड. भास्करराव उराडे, ज्येष्ठ सदस्य प्रा. जी. एन. केला व शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांनी तसेच प्रा. विनोद नरड व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment