Ads

उत्पादना व्यतिरिक्त अन्य कार्यातही वेकोली प्रशासन अग्रगण्य -महाप्रबंधक उदय कावळे

तालुका प्रतिनिधी भद्रावती:- वेकोली प्रशासन हे केवळ कोळसा उत्पादन व कामगार यांच्यातच अडकून न राहता वेळ आल्यावर इतर सामाजिक क्षेत्रात सुद्धा अग्रस्थानी राहून आपली भूमिका बजावत असतात असे मत मुख्य महाप्रबंधक उदय कावळे यांनी व्यक्त केले.In addition to production, WCL administration is leading in other activities - General Manager Uday Kawle.
वेकोली वणीक्षेत्राच्या ऊर्जा ग्राम(ताडाळी) येथील मनोरंजन केंद्रात दिनांक 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तथा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कोळसा उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांचा व त्यांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य महाप्रबंधक वनी क्षेत्र उदय कावळे, जीएम ऑपरेशनचे वैरागडे, बिनेश कुमार ,विवेकानंद मोहनतू, पंकज सिंग, एरिया मेडिकल अधिकारी डॉ. आनंद, वेल्फेअर कमिटी , कामगार संघटनाचे अध्यक्ष -सचिव, टि. एस. सी., सेफ्टी मेंबर आदी ची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती.
गेल्या वर्षात कोरोना प्रादुर्भावात व यावर्षी आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या भागात वेकोली प्रशासनाने सामाजिक कार्याचे भान ठेवून आवश्यक ते मदत कार्य केले. भविष्यातही वेकोली प्रशासन अशा सामाजिक कार्यात अग्रगण्य राहील, असेही यावेळी उदय कावळे यांनी सांगितले.
यावेळी पैनगंगा ,मुंगोली, निलजई आदीं वनी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा व शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या कामगारांच्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वेल्फेअर अधिकारी राकेशजी व मेडिकल अधिकारी सुवर्णा मानकर यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे संचालन पंकज कुमार यांनी तर उपस्थितताचे आभार डॉ. आनंद यांनी मानलेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment