Ads

अधिकाऱ्याचा जाचाला कंटाळून एस.टी वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या

चंद्रपुर :- राजूरा एसटी डेपोत TC या पदावर कार्यरत भगवान अशोक यादव, वय 30 वर्ष, रा. कन्नमवार वार्ड, टेकडी, बल्लारपूर या कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्यांच्या जाचाला व सतत पैश्याची मागणीला कंटाळून बल्लारपूर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना स्वातंत्रदिनी घडली.ST traffic controller commits suicide after getting tired of harassment by the officer
पत्नी रक्षाबंधनाकरिता गेली असता रात्री मित्रांसोबत बोलला, आईने जेवन वाढले परंतु रात्रो जेवण करतो तू झोप असे म्हणत सर्व झोपी गेले असता रात्रो बेडरूम च्या पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.


घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

भगवान च्या खिशात सुसाईड नोट पोलिसांना आढळली असून त्यात माझ्या मृत्यूला एसटी डेपोतील 2 अधिकारी कारणीभूत असल्याचे लिहिले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.#Sucide Note
पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment