Ads

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले ॲड. मोरेश्वर टेमुर्डे

जिल्हाधिकाऱ्यांकडे केला 50 हजारांचा धनादेश सुपूर्द

भद्रावती :- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने सर्वत्र शेतीचे व शेतमालाचे अपारीमित नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटग्रस्त या शेतकऱ्यांच्या मदतीकरिता विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड मोरेश्वर टेमुर्डे पुढे सरसावले.आणि मदत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पूरग्रस्त निधी म्हणून 50 हजाराची मदत  त्यांनी सुपूर्द  केली.

वरोरा - भद्रावती तालुक्यातील असून दुबार पेरणी झाली. दुबारपेरणीही नष्ट झाली आहे .खरिपातील तूर, कापूस व सोयाबीनचे पीक पाण्याखाली बुडल्याने शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत व्हावी म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेन्ट) वरोरा च्या वतीने 50 हजार रुपये मदत म्हणून धनादेश देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्यासह भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,   जिल्हा उपाध्यक्ष अविनाश इंगळे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment