Ads

भुस्खलन झाल्याने घर 60 ते 80 फुट गेले खड्यात, आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांसह केली पाहणी.

घुग्घुस :-वेकोलिच्या खाणी लगत असलेल्या घुग्घुस येथील अमराई वार्डात भूस्खलन Landslides in Amrai Ward झाल्याने गजानण मडावी यांचे घर चक्क 60 ते 80 फुट आत गेल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहे. यावेळी नायब तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी नवले, घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मडावी यांचे अर्ध्यापेक्षा जास्त घर या घटनेत खड्यात half of the houses were destroyed in this incident गेले आहे. पाहणी दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी जवळपासचा परिसर खाली करण्याचे निर्देश प्रशासनाला केले आहे. सदर नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. परिसर खाली झाल्यावर येथे चोरी सारख्या घटना घडु शकतात त्यामूळे येथे पोलिस उपलब्ध करुन देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी पोलिस निरिक्षकांना दिले आहे. सदर परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी महावितरण विभागाला केल्या आहे. सदर घटनेची माहिती वेकोलीचे वणी एरियाचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांना दिली आहे. वेकोलीनेही त्यांच्या सुरक्षा रक्षक व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला येथे तात्काळ पाचारन करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. घर खड्ड्यात गेल्याने आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबाचीही आ. जोरगेवार यांनी भेट घेतली असून पिडीत कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या आहेत. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते इमरान शेख, स्वप्नील वाढई, अबरार शेख आदींची उपस्थिती होती
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment