Ads

शेतमजुरांना घेवून जाणारे वाहन पलटले,5 गंभीर तर 3 किरकोळ जखमी A vehicle carrying farm laborers overturned, 5 seriously injured and 3 slightly injured

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील साईबाबा वॉर्डातील निवासी असलेल्या महिलांना शेतीच्या कामासाठी किन्ही येथे घेवून जाणारे चारचाकी वाहन टाटा सुमो क्रं. MH 32 EQ 0369 ने शेतातील निंदनाकरिता जात असतांना आज सकाळी 9:00 वाजताच्या दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व सदर वाहन विलास तेलंतुंबळे यांच्या शेतात जाऊन पलटी झाले.A vehicle carrying farm laborers overturned, 

या अपघातात 5 गंभीर जखमी तर 3 किरकोळ जखमी असल्याचे वृत्त आहे 5 seriously injured and 3 slightly injured सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात पूनम कमलाकर बोभाटे वय - 40, ललिता बबन चौधरी वय - 40, कांचन संघदीप कुंभारे वय - 39, निशा शिवकुमार कैथवास वय - 50, सुरेश बहुरिया ( वाहनचालक ) वय - 39, सदर 5 व्यक्ती गंभीर जखमी तर नीलिमा विनोद वाढई वय - 35, वर्षा संतोष नन्नावरे वय - 34, अर्चना नरेश हनुवते वय -30 किरकोळ जखमी आहेत सदर अपघाताची माहीती कळताच परिसरातील व्यक्तींनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून जखमींना गाडी बाहेर काढले व सदर अपघाताची माहीती बल्लारपूर पोलिसांना दिली व अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे प्राथमिक उपचार साठी दाखल कऱण्यात आले होते.

मात्र या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या 4 महिला व वाहनचालकांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे दाखल कऱण्यात आले. असून यापैकी काही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment