Ads

भद्रावती पोलिसांनी 48 लाख 82 हजारची अवैध दारू केली नष्ट

जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती:-भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत 2014 पासून जी दारूबंदी करण्यात आलेली होती ती अवैध दारू आज भद्रावती पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल भारती व दारूबंदी विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा आकेवार यांनी आज भद्रावती येथे एमटा रोडवर 84 गुन्ह्यातील 48 लाख ८२,६०० रुपये एवढी दारू नष्ट करण्यात आली.Bhadravati police destroyed illegal liquor worth 48 lakh 82 thousand
पो.स्टे भद्रावती येथील दारूबंदी कायद्या खालील एकुण ८४ गुन्हयातील देशी व विदेशी दारू साठा नाश करणे बाबत मा प्रथम श्रेणी न्यायदंडाधीकारी सा कोर्ट भद्रावती यांचे कडून आदेश प्राप्त झाल्याने व सदर बाबत मा अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांचे कडून आदेश क १) डीईटी / १२२०२२ / ज.मु.विल्हेवाट / ३०१८चंद्रपुर दि. २४/६/२०२२, क. २) डीईटी / ११२०२२ / ज. मु. विल्हेवाट / ३००५, चंद्रपुर दि. ०७/०७/२०२२. क. ३) डीईटी/११२०२२/ज.मु. विल्हेवाट./५०५८, चंद्रपुर दि.१८/०७/२०२२, ४) डीईटी / ११२०२२/ज.. मु. विल्हेवाट./६०६५, चंद्रपुर दि. २८/०७/२०२२ अन्वये दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वरोरा यांना आदेश प्राप्त झाल्याने आज दि ०४/८/२०२२ रोजी एस. एन आक्केवार दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वरोरा तसेच श्री गोपाल विठठल भारती पोनी पो.स्टे. भद्रावती यांचे उपस्थितीत पो.स्टे. भद्रावती येथील दारू बंदी कायद्या अंतर्गत अवैद्य देशी दारू च्या २० मिलीच्या ३७७१० नग, विदेशी दारू १८० मिली च्या २४६० नग, विदेशी दारू ३७५ मिलीच्या ३७ नग, विदेशी बियर ५०० मिली ७ नग, विदेशी दारू ७५० मिली १५ नग असा एकुण ४०२२९ नग मुददेमाल किंमत अंदाजे ४८,८२,६००/- रू चा माल राज्य उत्पादन शुल्क वरोरा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच पंचाचे उपस्थीतीत मजुर लावून भद्रावती जवळील कर्नाटका एम्टा रोड वर देशी व विदेशी दारूचे बाटलांवर रोडरोलर चालवुन दारूचा माल नाश केला व बाजुला खड्डा करून त्यात पुरण्यात येवुन व मातिने बुझवण्यात आले.
यावेळी ठाणेदार गोपाल भारती , राज्य उत्पादन शुल्के दुय्यम निरीक्षकवरोरा अक्केवार और सुनंदा वनकर, तनुज टेकाम ,शुभांगी जामखुटे, शिल्पा लोन गाडगे, उपस्थिती होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment