Ads

मेहुणी सोबत बोलण्यावरून दगड मारून युवकास केले जखमी

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- दि
.8/7 शुक्रवार ला शहरातील नगरपंचायत च्या नव्या प्रभागातील रहिवाशी असलेल्या स्वप्नील नामक युवकाने माझ्या मेहुणीशी बोलू नको असे सुमितला सांगितले त्यावरून स्वप्निल व सुमित यांच्यात भांडण झाले असून स्वप्नील ने सुमित सोबत भांडण होऊन शिवीगाळ व मारामारी करत सदर भांडणात स्वप्नील ने दगड हातात घेऊन सुमितच्या डाव्या गालावर मारले व स्वप्नील ने सुमितला म्हटले की या नंतर परत माझ्या मेहुणीच्या सोबत बोलताना दिसला तर तुला जीवानिशी मारिन असे धमकी दिली व निघून गेला. दगड मारल्यामुळे सुमित जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले व डॉक्टरच्या वैद्यकीय (मेमो) नुसार तसेच तपासानुसार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट झाली असून ठाणेदार यांच्या आदेशान्वये आरोपी स्वप्निल वर अप. क्रमांक 185/ 2022 नोंद करीत कलम 324, 504 ,506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस हवालदार बांबोळे हे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment