Ads

घर कोसळल्याने जखमी झालेल्या कुटुंबियाच्या मदतीसाठी सरसावली यंग चांदा ब्रिगेड

चंद्रपुर :- घर कोसळल्याने एकाच परिवारातील आई आणि दोन मुले जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास बाबुपेठ येथील पंचशिल चौकात घडली. घटनेची माहिती मिळताच यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत कुटुंबातील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मंजु बारसागडे आईचे तर आर्यन बारसागडे वय 10, प्रशिक बारसागडे वय 12 अशी जखमी मुलांची नावे आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असुन त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराबाबत माहिती घेतली आहे.
आज सकाळी 10 च्या सुमारास बाबुपेठ येथील पंचशिल चौकात राहणा-या बारसागडे यांच्या घरावर बाजुच्या घराची भिंत कोसळली या घटनेत आई आणि दोन छोटी मुले जखमी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावर, शहर संघटक रुपेश पांडे, यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली महिला समाज शहर अध्यक्षा सविता दंडारे, बादल हजारे, प्रतिक हजारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेही यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सोनाली आंबेकर यांनी जखमी कुटुंबाला योग्य वैद्यकीय मदत मिळवून दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात जावून जखमी परिवाराची भेट घेतली यावेळी डॉक्टरांकडून जखमींवर सुरु असलेल्या उपचाराबाबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी विचारना केली असून उपचाराकरीता आर्थिक मदत केली आहे. तसेच यावेळी त्यांनी जखमींना आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना डॉक्टरांना केल्यात. शासनातर्फेही सदर कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सुचना संबंधित विभागाला केल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment