Ads

उभ्या ट्रकला गणराज ट्रॅव्हल्सची जोरदार धडक

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- नागपूर - चंद्रपूर महामार्गावर नागपूर हून चंद्रपूर कडे जाणाऱ्या गणराज ट्रॅहल्स ने डाली पेट्रोल पंप जवळ उभ्या ट्रकला धडक दिल्याने चालकासह सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली ही घटना रात्री नऊच्या दरम्यान घडली असून यातील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रमोद पालेकर चालक, वैभवी हलामी, रोशनी हलामी, शांता हलामी राहणार गडचिरोली, दिलीप साठे, अखिल खान, साहिल शेख राहणार चंद्रपूर असे जखमी प्रवाशांची नावे आहे गणराज ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 32 ए जे 7984 ही नागपूरहून प्रवासी घेऊन चंद्रपूर कडे जात असताना चालकाच्या हलगर्जीपणाने त्याने समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली यात चालकासह सात प्रवासी जखमी झाले जखमींना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रवासी शांता हलामी राहणार गडचिरोली यांच्या तक्रारीवरून चालक प्रमोद पालेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल कोल्हे करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment