Ads

मोठ्या तलावाच्या पाडीला पडले भगदाड

सावली :-सावली शहरा लगत असलेल्या मोठ्या मामा तलावाला भगदाड पडल्याने तिथून पाणी वाहत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी त्या प्रभागाचे नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्याकडे केली असता घटनास्थळी जाऊन बघून नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी या संदर्भातून माहिती सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना दिली. त्यानंतर तहसीलदार पाटील हे मंडळ अधिकारी, तलाठी, सिंचन विभागाचे अभियंता व इतर कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.
मालकी मालगुजारी मोठा तलावाचा पाळीतून एक मोठा छिद्र पडल्याने तिथून पाणी पाहत असल्याचे दिसून आले त्यानंतर भविष्यात या ठिकाणी मोठी हानी होणार असल्याचे दिसल्याने सदर छिद्र बुजवण्याची प्रक्रिया करण्यात आली.यावेळी नगरसेवक सतीश बोम्मावार,मोहन गाडेवार शंकर दिकोंडवार,विलास आकुलवार,राकेश गोलपल्लीवार यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment