Ads

तालुक्यातील विद्यार्थ्यांची अकराविच्या प्रवेशासाठी पायपीट

ब्रम्हपुरी:- अख्या विदर्भासोबतच संपुर्ण महाराष्ट्रात शिक्षणाच्या व वैद्यकित क्षेत्रात क्रांती घडविलेल्या चंद्रपुर जिल्हातील "ब्रम्हपुरी" शहराचे नाव लोकप्रिय आहे.आधिच्या काळापासूनच ब्रम्हपुरी येथे शिक्षणाच्या सर्व सोई असल्याने आजुबाजुच्या जिल्हातिल विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ब्रम्हपुरी येथे शिक्षण घेण्याकरीता येतात.एक वैद्यकिय शिक्षण सोडल तर साधारणत: सर्वच प्रकारचे शिक्षण ब्रम्हपुरी येथे उपलब्ध आहे.असे असतानाही यावर्षी अकराविचा प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थांना मोठी कसरत करावी लागत आहे ही एक चिंतेची बाब आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालक ही चिंताग्रस्त आहेत."सर प्लिज. . . मला अकराविला प्रवेश द्या ना. . . ""Sir, please ... let me give admission for the eleventh." अशी केविलवाणी विनवणी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांच्या प्रवेश विभागांना व प्राचार्यांना केली जात आहे.
ब्रम्हपुरी तालुक्याचा दहाविचा निकाल यावर्षी दरवर्षी पेक्षा चांगला लागलेला असुन तालुक्यातून २५२२ विद्यार्थी दहाविच्या परिक्षेला बसले असता २४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.ब्रम्हपुरी तालुका खुप मोठा असुन एकुन ३५ शाळेतील विद्यार्थ्यांनी दहाविची परिक्षा दिलेली होती.त्यामध्ये १५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.तालुक्यातील सगळ्याच शाळांचा निकाल उत्कृष्ट लागला.पण उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अकराविची प्रवेश क्षमता तालुक्यातील महाविद्यालयात कमी पडत आहे.यावर्षी बर्‍हाच विद्यार्थ्यांना चांगले टक्के गुण मिळाले त्यांनी वेळ न गमावता आवडिच्या शाखेत प्रवेश मिळावला पण कमी टक्के गुण मिळविणार्‍या व इकडच्या तिकडच्या चाैकशीत वेळ घालविणार्‍या विद्यार्थ्यांना आज च्या घडिला प्रवेश मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.तालुक्यात नेवजाबाई हितकारीनी महाविद्यालय,आंबेडकर महाविद्यालय,ख्रिस्तानंद कनिष्ट महाविद्यालय,ने.ही.मुलांची शाळा,लो.टी.कनिष्ट महाविद्यालय,पंजाबराव देशमुख कनिष्ट महाविद्यालय यासोबतच गांगलवाडी,निलज,चाैगान,माैशी येथे सुद्धा कनिष्ट महाविद्यालय आहेत.संपुर्ण तालुक्याच्या कनिष्ट महाविद्यालयाची प्रवेश क्षमता लक्षात घेतली तर जवळपास २१०० च्या आसपास आहे आणि उत्तीर्ण विद्यार्थीसंख्या २४५१ एवढी आहेत तेव्हा जवळपास ३५१ एवढ्या जागा कमी पडत आहेत अशा परीस्थितीत उर्वरित विद्यार्थ्यांनी काय करावे? असा गहण प्रश्न निर्माण होत आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्या विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान या शाखेकडे अधिक आहे. अधिकाअधिक विद्यार्थ्यांना डाँक्टर, इंजीनिअर बनावेसे वाटते मुळात पालक सुद्धा यासाठी आग्रही असतात.वैद्यकिय क्षेत्राच्या निट आणी इंजिनिअरिंग क्षेत्राच्या जेईई परिक्षेच्या तयारी साठी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आवश्यक असते तसेच तालुक्यात सेमीइंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत यातुन दहावी चा उत्तिर्ण विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतो त्यामुळे या शाखेच्या प्रवेशासाठी प्रत्येकच महाविद्यालयात चढाओढ आहे.कला,वाणिज्य,व्यावसायीक शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविलेली आहे त्यामुळे सद्यस्थितित तालुक्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेश मर्यादा जवळपास पुर्ण झाल्याने उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ होताना दिसत आहे. विज्ञान शाखेचे अकराविचे प्रवेश फुल्ल झाल्याने आजच्या घडिला कमी टक्केवाल्या विद्यार्थ्यांसोबतच ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सुद्धा महाविद्यालयाने नाकारले आहे.प्रवेशासाठी विद्यार्थी महाविद्यालयात चकरा मारताना दिसत आहेत.या बाबतित शासनाने लक्ष देवुन ब्रम्हपुरी तालुक्यातिल अकराविच्या प्रवेश मर्यादा वाढविण्याच्या दृष्टिने तसेच पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टिने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment