Ads

मुल चंद्रपूर मार्गावर केसलाघाट जवळ बस- ट्रकची समोरासमोर जोरदार धडक

मुल प्रतिनिधी :- मूल वरुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या बस आणि चंद्रपूर वरून मूल कडे येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी several injured झाल्याची घटना मूल - चंद्रपूर मार्गावर (ता. 4 जुर्ले) रोजी 5 वाजता दरम्यान घडली. Bus truck collision
परिवहन महामंडळाची बस क्रं. एम एच 40 एक्यु 744 ही मूल बस स्थानकावरुन चंद्रपूरकडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रं. सी जी 04 आय एफ 6255 मूलकडे येत होता, दरम्यान बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. Msrtc मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार बस चालकाचे दोन्हीही पायाला गंभीर जखम झाली असून, रुग्णवाहिकेने तातडीने त्यांना चंद्रपूरला हलविले आहे. अन्य प्रवाशांना किरकोळ जखमा झाले आहे. बस चालकांनी विरुद्ध दिशेने जाऊन ट्रकला ठोस मारल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन जखमीना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. गडचिरोली मूल चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर दररोज दोन ते तीन अपघात होत असल्याने प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे आवश्यक असल्याचे मत आता व्यक्त केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment