Ads

रुग्णाच्या मदतीला धावले “देव”राव भोंगळे

चंद्रपुर:- साहिल कालिदास वाघाडे (१७) रा. तोहगाव ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर या बालकाला मलेरिया झाला त्यामुळे त्याला मेंटल इर्रीटेबीलिटी त्रास सुरु झाला, प्रकृती गंभीर झाल्याने शुक्रवारी सायंकाळी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष योगेश खामणकर यांनी ही माहिती गोंडपिपरीचे तहसीलदार मेश्राम यांना सांगितली त्यांनी रुग्णवाहीकेची व्यवस्था केली परंतु तोहगावला चारही बाजूने पूराने वेढा घातला असल्याने साहीलसाठी आलेली रुग्णवाहीका दहा किमी अंतरावरच येऊन अडकली.
त्यामुळे योगेश खामणकर यांनी ही माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना दिली त्यांनी तत्काळ याची दखल घेत कोठारीचे ठाणेदार चव्हाण यांना ही माहिती देऊन तातडीने सहकार्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदत कार्यासाठी एक बोट शनिवारी सकाळी ठानेदार चौहान साहेब यांनी रुग्णाला आणण्यासाठी तोहगावला पाठवली, व स्वता हजर राहून बोटीच्या मदतीने रुग्णाला बाहेर काढून चंद्रपूर येथील रुग्णालयात भर्ती करण्यात आले. आणि आता साहिलवर उपचार सुरू आहेत.

एका फोनवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तातडीने प्रशासनाला कामाला लावून रुग्णासाठी केलेल्या मदतीबद्दल योगेश खामणकर यांनी आभार मानताना देवराव दादा व ठानेदार चौहान साहेब देवाडकर रूपाने तोहगावच्या साहिलसाठी देव'चं धावून आला असे भावपूर्ण उद्गार काढले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment