Ads

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाने देशाचा सन्मान वाढला-हंसराज अहीर

President Draupadi Murmu's victory increased the honor of the country - Hansraj Ahir
चंद्रपुरः- स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर पहिल्यांदा आदिवासी समाजाच्या महिला माननिय द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अभिनंदन करीत हा भारतीय संविधानाचा विजय असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
भाजपा हा संविधानाचा आदर करणारा एकमेव राजकीय पक्ष असून देशातील प्रत्येक घटकांच्या उन्नतीसाठी भाजपाने संविधानीक पध्दतीनेच निरंतर कार्य केले आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करुन त्यांना सर्वोच्च पदावर विराजमान करण्यात मोलाचे कार्य केले असून राष्ट्रपती श्रीमती मुर्मूंचा हा विजय केवळ आदिवासी समाजाचाच सन्मान वाढविणारा नसून तो देशाचा व अखिल भारतीय स्तरावरील सर्व जाती, धर्म, पंथांचा सन्मान वाढविणारा असल्याचेही हंसराज अहीर म्हटले आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment