Ads

पिंडवणी तलाव ओव्हरफ्लो ; न. प. ची टिम घटनास्थळी

भद्रावती : शहरातील पिंडोणी तलाव बुधवारी उत्तररात्री १.३० च्या दरम्यान ओव्हरफ्लो झाला. परिसरातील नागरिकांना पुराचा धोका होवू नये म्हणून न. प. ची चमू पहाटेच घटनास्थळी दाखल झाली. Pindwani lake overflow municipal Corporation team at the spot तलावाच्या पाण्याचा जलद विसर्ग होण्यासाठी चमुकडून तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला आहे.
ऐन शहरात असलेला हा तलाव मासेमारी तसेच शिंगाड्यांसाठी प्रसिध्द आहे. मागील १० वर्षांपुर्वी सततच्या पावसामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यावेळी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते, असे परिसरातील नागरिक सांगतात.

मागील काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झाला. घटनेची गंभीरता लक्षात घेत न.प. चमुकडून पाण्याच्या विसर्गासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे.

यावेळी भद्रावती न.प.चे आरोग्य निरीक्षक रविंद्र गड्डमवार, सफाई मेट बाजीराव नान्ने, माजी नगरसेवक प्रमोद गेडाम, माजी नगरसेवक नाना दुर्गे, लिपीक भुजंग पोटे व न. प. चे मजुरवर्ग उपस्थित होते.

भद्रावती नगर परिषदेच्या कामाचे शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असुन आभार मानले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment