Ads

पप्पू देशमुख यांनी स्वीकारले जिल्हाधीकाऱ्यांचे आवाहन : यापूर्वीच्या तक्रारींचे काय झाले?

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर जुनी दारू दुकाने पूर्वरत सुरु करण्यासाठी तसेच दारू दुकानाचे स्थलांतरण व मंजुरीसाठी 18 ते 20 कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
याचा खुलासा करत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दारू अनुज्ञप्त्यांची मंजुरी नियमानुसार झाल्याचे तसेच या प्रकरणात कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण झालेली नसल्याचे प्रसिद्धीपत्रकातून कळविले. तसेच दारू दुकानाच्या बाबत कोणालाही तक्रार असल्यास निवेदने व लेखी पुरावे देण्याचे आवाहन केले होते. परंतु यापूर्वी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह दिलेल्या तक्रारिंचे काय झाले? असा प्रश्न पप्पू देशमुख यांनी करत प्रशासनाचे पुरावे देण्याचे आव्हान स्वीकारत 11 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना रिक्षात भरून पुरावे देण्याचे प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. त्यामुळे दारू दुकान वाटप व स्थलांतराचा मुद्दा आता गंभीर वळणावर आलेला आहे.
वडगावला नशेचे केंद्र बनविण्याचे कट-कारस्थान हाणून पाडू
वडगाव प्रभागातील डॉ. राम भरत यांच्या बाल रुग्णालयाशेजारील महालक्ष्मी टाॅवर या निवासी इमारतीमध्ये नियम डावलून देशी दारू दुकानाला मंजुरी देण्यात आली. त्या विरोधात पुरावे देऊनही राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलटपक्षी आंदोलन करणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. यानंतर वडगाव प्रभागातील ओम भवन परिसरात पुन्हा एक देशी दारूचे दुकान सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रभागात वाईन शॉप ,परमिट रूम आणि अनेक बियर शॉपिंना परवानगी देण्यात आली आहे. या प्रभागात मोठी गुंतवणूक करून भविष्यात प्रभागाला नशेचे केंद्र बनवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. परंतु पैशाच्या हव्यासाने झपाटलेले काही लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हे कट कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिलेली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment