Ads

घर कोसळून वृद्ध महिला जखमी

घुग्घुस:- घुग्घुस परिसरात मागील सात दिवसापासून संततधार पाऊस सुरु असल्याने पौर्णिमा विठ्ठल वाघमारे रा. वार्ड क्र. 1 घुग्घुस या वृद्ध महिलेच्या घराची भिंत गुरुवार 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास कोसळली वृद्ध महिला घरात असल्याने घराचे कवेलू व लाकडी फाटे तीच्या अंगावर पडले यात ती जखमी झाली तीला लगेच भाजपा कार्यकर्त्यांनी प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी भर्ती केले.The old woman injured in home collapse

याबाबत कळताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तलाठी कार्तिक आत्राम, परशुराम पेंदोर, भाजपाचे राजेश मोरपाका, राजू डाकूर यांनी प्रा. आ. केंद्रात जाऊन वृद्ध महिला पौर्णिमा वाघमारे यांची भेट घेतली व विचारपूस केली तसेच घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त घराची पाहाणी केली. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून याबाबतची माहिती दिली त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली. तलाठी कार्तिक आत्राम यांनी पंचनामा केला.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी वाघमारे दाम्पत्यांना जेवणाची व्यवस्था करून दिली तसेच सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
आनंद वाघमारे हे वयोवृद्ध असून सकाळी गाय चारण्यासाठी बाहेर गेले होते त्यामुळे ते थोडक्यात बचावले. वाघमारे कुटुंबाची परिस्थिती गरिबीची असल्याने व त्याने कवेलूचे राहते घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले असून ते बेघर झाले आहे. बेघर झालेल्या वाघमारे कुटुंबियांना राहण्याची पर्यायी व्यवस्था भाजपातर्फे करण्यात येणार आहे.

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी नपचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मदत मिळवून देण्यासाठी चर्चा केली व नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment