Ads

*दिवंगत कामगार नेते हरिभाऊ नाईक यांना मुंबई काँग्रेस तर्फे श्रद्धांजली !

मुंबई :- माजीमंत्री आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे नुकतेच नागपूर येथे वार्धक्यात(९४) निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मुंबई काँग्रेस, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ,व भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील एसटी , वीज, साखर कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई काँग्रेसच्या, मुरली देवरा सभागृहात शोकसभा घेण्यात आली .
या वेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी कामगार नेते हरिभाऊ नाईक यांच्या कामगार चळवळीतील कार्याला उजाळा दिला. हरिभाऊ नाईक नागपूर रा.मि.संघ,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष होते.केंद्रिय इंटकची विविध पदे भुषवितानाच त्यांनी आय.एल.ओ.मध्ये कामगारांचे प्रतिनिधित्व केले आहे , नागपूरचे नगरसेवक ते राज्याचे राज्यमंत्री अशी अनेक पदे भूषवली व त्या पदाना न्याय देत कामगारांना व सर्व सामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. असेही जगताप यांनी सांगितले.
हरिभाऊ नाईक यांच्या अदर्शावरच माझ्या सारखे अनेक कामगार नेते तयार झाले.व आजही कामगार चळवळीत काम करीत आहेत. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या सभेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड शशिकांत पवार, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, कामगार नेते दिलीप जगताप, सदाभाई चव्हाण, एस. आर. सावंत, श्रीरंग बरगे, सुनील शिंदे,अतुल बर्वे, रणजित जगताप, वीरेंद्र पवार, ॲड अभिजित पाटील, गोरक कांगणे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थतीत होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment