Ads

खासदार बाळू धानोरकर यांनी बल्लारपूर येथे केली पुरस्थितीची पाहणी

जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना
# शाळा, कार्यालयाला सुट्टी जाहीर करा
# शेतीचे, घरांचे पंचनामे तात्काळ करा
# माणिकगड, चुनाळा येथे रेल्वेला थांबा द्या
# संपर्क तुटलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा
चंद्रपूर : आठवड्याभरापासून संततधार पाऊस सर्वत्र पडत आहे. त्यासोबतच इरई व इतर धरणाचे Irei and other dams देखील पूर्ण दरवाजे उघडले आहे. त्यामुळे राजुरा- चंद्रपूर मार्ग पूर्ण पणे बंद होऊन संपर्क तुटला आहे. बल्लारपूर येथील ९० घरामध्ये पाणी आले आहे. त्यामुळे शाळा, कार्यालयाला सुट्टी जाहीर करा, शेतीचे, घरांचे पंचनामे तात्काळ करा, माणिकगड, चुनाळा येथे रेल्वेला थांबा द्या, संपर्क तुटलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करा अशा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.MP Balu Dhanorkar inspected the flood water condition in Ballarpur
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार राईचवार, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर देवळीकर, पोलीस निरीक्षक पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, माजी नगरसेवक देवेंद्र आर्या, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, माजी नगरसेवक इस्माईल ढाकवाला, माजी नगरसेविका आत्राम, सामाजिक कार्यकर्ते अशोक मत्ते, नरेश मुंधडा, अफसाना सय्यद तसेच जनता विद्यालय येथील कर्मचारी वृंदाची उपस्थिती होती.

आज त्यांनी स्वतः बल्लारपूर येथील विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये तालुक्याचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला. त्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी होता कामा नये यासाठी प्रशासनाने तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासोबत त्यांनी शहरातील पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी भेटी दिल्या. तसेच ज्या ठिकाणी पूर पीडित बांधव जनता विद्यालयात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी देखील भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment