Ads

थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :-थकीत वीज बिल वसुलीसाठी सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जवळील सिंगडझरी या गावी गेलेल्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञ नवरगाव येथील कर्मचाऱ्याला ग्राहकाने मारहाण केल्याची घटना २७/०७/२०२२ बुधवार दुपारी -१ :१० समोर आली आहे. A Mahavitraan employee who went to collect the overdue electricity bill was beaten u

नवरगाव येथील महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ आपल्या सहाय्यक सोबत थकीत विद्युत बिल वसुली करण्यासाठी तालुक्यातील सिंगडझरी गावी गेले होते. गावातील एका व्यक्तीचे वीज बिल हे थकीत होते. त्यामुळे सदर व्यक्तीच्या घरी महावितरण विभागाचे कर्मचारी गेले असता त्या व्यक्तीला म्हटले की तुम्ही थकित असलेले वीज बिल भरलेले नाही विज बिल आज भरून टाका नाहीतर वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे ते म्हणाले असता सदरील वीज ग्राहक असलेल्या व्यक्तीने असे कसे वीज पुरवठा खंडित कराल असे म्हणत त्याने उपस्थित असलेल्या महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याचे कॉलर पकडले आणि काठी उचलून वरिष्ठ तंत्रज्ञ त्यांच्या डाव्या गालावर मारले तसेच मारण्याची धमकी दिली त्यानंतर महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याने घडलेला सर्व प्रकार हा सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये सांगितला व सिंगडझरी येथील त्या ग्राहकाची रिपोर्ट दिली त्यावरून पोलिसांनी तालुक्यातील सिंगडझरी मधील त्या सदरील वीज ग्राहक व्यक्तीला अटक केली व त्यावर अप क्र. 202/ 2022 कलम - 353, 332 ,504 ,506,186 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment