Ads

घरच्या गोठ्यात पट्टेदार वाघाचा मुक्काम

वरोरा : जिल्ह्यात वाघ आणि नागरिकांचा संघर्ष हा नेहमी पहायला मिळतो आहे. कधी जंगलात गेलेल्या नागरिकांवर वाघाचा हल्ला होतो. तर कधी वाघच गावात येऊन हल्ला करतो. कधी तर घरात घुसून नागरिकांचे जीव घेतो. ह्या घटना दिवसागणीक घडत असल्याने वाघ आणि नागरिकांमधील संघर्ष वाढतच आहे. आतापर्यंत बिबट्याच्या घटना समोर आलेल्या होत्या. आता तर पट्टेदार वाघही गावात येऊन नागरिकांच्या घरांवर अतिक्रमण करायला लागले आहेत. अशीच एक घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीय आली आहे. चंदपूर जिल्ह्यातील चिमूरतालुक्यात शेगाव (बुज) येथे दुपारच्या सुमारासएक भल्ला मोठा पट्टेदार वाघ एका घरात घुसल्याची घटना उघडकीस आली आहे.

विजांच्या कडकडात पाऊस धोधो कोसळत असताना शेतशिवारातून पट्टेदार वाघाने थेट गावातील मधुकर भलमे यांचे घरी गोठ्यात आश्रय घेतला आहे. दुपारपासून तर वृत्तलिहीर्पंत वाघ त्याच ठिकाणी ठिय्या मांडून बसला आहे. नेहमी अभयारण्यात जावून वाघ बघावे लागते मात्र आज दुपारपासून वाघाला बघण्यासाठी पावसात छत्र्या घेऊन गावकऱ्यांची गर्दी होत आहे. एकीकडे पर्यटनाचा आनंद होत असला तरी रात्र होऊनही वाघ गोठ्यातून बाहेर पडत नसल्याने नागरिकांचे जिव टांगणीला लागलेले आहे.गावकऱ्यांमध्ये प्रचंड दशहत पसरली आहे.

चिमूर वरोरा मार्गावर चारगाव (बुज) हे छोटेसे गाव आहे. आज रविवारी दुपार पासून ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. चिमूर तालुक्यातही मोठ्याने पाऊस येत आहे.

विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस येत असल्याने नागरिक घरीच आहेत. अशातच दुपारी शेतशिवारातून एक भल्ला मोठा पट्टेदार वाघ गावात शिरला. चागरगाव वायगाव
रस्याानवरील मधुकर भलमे यांच्या घरातील गोठ्यात घुसूला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर गोठ्यातील वरच्या मजल्यावरील चार ठेवण्याच्या छावणीत घुसूला आहे. सदर घटना भलमे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गावातील नागरिकांना कळविले. त्यामुळे दुपार पासून नागरिक त्या पट्टेदार वाघाला पाहण्यासाठी भलमे यांच्या घरी गर्दी करीत आहेत.

दुपारपासून जोरदार पाऊस असल्याने भलमे यांच्या गोठ्यातून वाघ बाहेर पडण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. चारगाव हा परिसर ताडोबा अभयारण्याला लागून आहे. शिवाय अनेक गावे या अभयारण्याला लागून असल्याने वाघांचे दर्शन हे नागरिकांना नित्याची बाबत झाली आहे. परंतु भलमे यांच्या गोठयात वरच्या मजल्यावर थेट दुपार पासून पट्टेदार वाघाने ठिय्या मांडल्याने नागरिक पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करीत आहेत.

दुपार पासून वाघ गोठ्यातून बाहेर पडत नसल्याने भलमे कुटूंबिय आणि गावकरी प्रचंड दहशतीत आहेत. गोठ्यात वाघ घुसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आलेली असून वृत्तलिहीपर्यंत वनिवभागवा ताफा चारगाव येथे पोहचलेला नव्हता. त्यामुळे रात्र होऊनही वाघ अद्याप गावात सात तासापासून ठाण मांडून बसलेला आहे. एकीकडे सुरू असलेला पाऊस • आणि रात्रीची वेळ असल्याने वनविभागाचे अधिकारी कशाप्रकारे रेस्यूल् करून वाघाला गावातून आणि भलमे यांच्या घरातून कशाप्रकारे बाहेर काढतात हे पहावे लागणार आहे. मात्र वेळ रात्रीची असल्याने चारगाववासीयांना ही रात्र भितीमय वातावरणात काढावी लागणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment