Ads

भर पावसात काँग्रेसचे जि.एस. टी. विरोधात आंदोलन I

घुग्घुस :- बहोत हुई म्हांगाई की मार अब की बार मोदी सरकारच्या घोषणा देत सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी शासनाने गहू, दही,पनीर सारख्या खाद्य पदार्थावर पाच टक्के वस्तू व सेवाकर लावले यासोबतच शालेय साहित्यावर अठरा टक्के,हॉस्पिटल रूम यासह अन्य जीवनावश्क वस्तू वर लादलेल्या वस्तू व सेवा कराच्या निषेधार्थ आज दुपारी बारा वाजता भर पावसात गांधी चौक घुग्गुस येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.Congress' Protest against G.S.T
भर पावसात ही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आंदोलनात हजेरी लावून हातात फलक घेवून मोदी सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देत निषेध नोंदविला.

केंद्रातील मोदी सरकार हे श्रीमंतांचे सरकार असून सर्व सामान्य व गरीब जनतेला विविध कराच्या माध्यमातून महागाई वाढवून जगणं हराम करीत आहे.
हे सरकार पूर्णतः अपयशी असून
नोटबंदी, जि. एस. टी. शेतकरी विरोधी, कामगार विरोधी कायदा ,अश्या अनेक जनविरोधी योजनेचे हे फसवें सरकार आहे अश्या शब्दात
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी आपले मत व्यक्त केले.

देशातील जनतेने आता तरी सावध व्हावे आपल्या देशाची वाट चाल हे श्रीलंकेच्या दिशेने होत असल्याचे मत माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पवन आगदारी यांनी व्यक्त केले.
किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी वाढत्या महागाईला घेवून मोदी शासनाला धारेवर धरले गेली सत्तर वर्षात जे कधीच घडल नाही ते या सरकारने करून दाखवलं खाद्य पदार्थावर पाच टक्के वस्तू व सेवा कर लावून हे गरीब विरोधी सरकार असल्याचे सिद्ध केले

याप्रसंगी सौ.संगीता बोबडे,सौ.यास्मिन सैय्यद,सौ. पदमा त्रिवेणी, आमिना बेगम,दुर्गा पाटील,संध्या मंडल,सौ.मंगला बुरांडे, कामगार नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, डॉ. वासेकर, तिरुपती महाकाली,शेख शमिउद्दिन,अलीम शेख,मोसिम् शेख,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,आकाश चिलका,शाहरुख शेख,देव भंडारी,साहिल सैय्यद,रफिक शेख,प्रशांत सरोकार,अरविंद चंहादे,दीपक पेंदोर्, दिनेश घागरगुंडे,दीपक कांबळे,कुमार रुद्रारप,सुनील पाटील, बालकिशन कुळसंगे,योगेश ठाकरे,वतन अटेला,सुधाकर जुनारकर,कपिल गोगला,बापूजी क्षीरसागर,विशाल नागपुरे,प्रदीप आसेकर,अजय त्रिवेणी,अंकुश सपाटे,राजकुमार निरवटला,नाना परसुटकर, सौरा लंका यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment