भद्रावती ता. प्रतिनिधी:-अतिवृष्टीचा भद्रावती तालुक्यातील नदी तथा नाले परिसरातील गावकऱ्यांना चांगलाच तडाखा बसला असुन या अतिवृष्टीमुळे नदि-नाले परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.Hundreds of acres of farmland in the taluka were flooded due to heavy rains.
पुरप्रभावित गावांतील खरिपाचे पिक उध्वस्त झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक खेड्यांचा संपर्क पुरामुळे एकदुसऱ्याशी तुटला आहे.तालुक्यातील कोकेवाडा,किन्हाळा,सोनेगाव, आष्टा,अर्जुनी या गावशिवारातील नदी तथा नाले परिसरातील शेत्या पुराच्या पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती कोकेवाडा येथील शिवसेना नेते अभय खिरटकर यांनी दिली आहे. अभय खिरटकर यांनी या परिसरातील आढावा घेतला आहे. इर ई नदिच्या पुलावरुन पुराचे पाणी वाहात असल्याने कोकेवाडा-शेगाव,आष्टा-शेगाव मार्ग बंद झाला आहे. अद्यापही पाऊस सुरुच असल्याने स्थिती आणखी बिकट होइल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment