Ads

चौगान -बेटाळा फाट्यावर अवैध दारूचा महापूर

ब्रह्मपुरी :-चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी नुकतीच आठ-नऊ महिन्याअगोदर उठली. तर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री संपली असे वाटत होती. परंतु उलट ग्रामीण भागातील बऱ्याच गावागावात रात्रीच्या सुमारास अवैध दारू पुरवली जाते. त्यामध्ये ब्रह्मपुरी-आरमोरी रोडवर असलेला चौगान -बेटाळा फाट्यावर व कीन्ही गावातील बस स्टॉप जवळ मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते. Flood of illegal liquor at Chaugan-Betala Square
चौगान-बेटाळा फाट्यावर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ,महाराष्ट्र ऑफ पॉलिटेक्निक बेटाळा कॉलेज बऱ्याच वर्षांपासून आहे. कृषक विद्यालय &ज्यू कॉलेज चौगान येथील शालेय विद्यार्थी रोज जाणे-येणे करीत आहेत. अवैध दारू विक्रीमुळे शालेय मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील किही,रणमोचन,बेटाळा,पारडंगांव,बोढेगांव येथील विद्यार्थी शिक्षणा साठी चौगानला येत असतात. महाराष्ट्र ऑफ पॉलिटेक्निक मध्ये तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील विद्यार्थी येत असतात. त्यांना मात्र सदर चौकातमोठ्या प्रमाणात अवैध दारू मिळत असल्यामुळे परिसरातील लोक दारू पिण्यासाठी जमा होत आहेत. त्याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष आहे. तर बिटातील जमादार यांना दर महिन्याच्या हप्ता देत असल्यामुळे कारवाई करीत नाही. अशी चर्चा चौकात केली जात आहे. सदर चौकात अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment