Ads

प्रलंबित दाव्यांचा निकाल येईपर्यंत अतिक्रमितांवर कारवाई करू नका .

चंद्रपूर :- मूळ भूमी धारक भूमिहीन होऊ नये हि खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेळोवेळी मागणी केली आहे. मागील अनेक दशकांपासून बोथली येथील शेतकऱ्यांचे तसेच वैयक्तिक वनहक्क धारकांचे दावे प्रलंबित आहे. सध्या त्यांचे राहणे व रोजगार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा प्रश्न तात्काळ निकाली काढून ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी केली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात विस कलमी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपसंचालक बफर गुरुप्रसाद, ताडोबा उपसंचालक (कोर) काळे, उपविभागीय अधिकारी चिमूर सपकाळ, विजय देठे, माधव जीवतोडे, शंकर भारडे, सरपंच विनोद देठे, देविदास नन्नावरे, रामकृष्ण वाघ, बबलूपाटील थुटे तसेच बोथली येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्वस्त झाले. अनेकांनी कुटुंबासह रोजगार देखील गमावला आहे. आज घडीला प्रत्येक कुटुंब संसाराच्या गाडा चालविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात बोथली येथील ग्रामस्थ देखील मागील अनेक वर्षापासुन वनावर आधारित उद्योग व शेती करून आपली उपजीविका पार पडत आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे वनहक्क कायद्याचे कलम ३(१) प्रमाणे मागणी केलेल्या वनहक्क दाव्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये. अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment