Ads

पत्रकार संघाची कारवाई प्रशासनाची दिरंगाई.

ब्रह्मपुरी :-केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरी च्या सदस्यांनी पिंपळगाव मशानभुमी जवळ अवैध वाळू वाहतूक करीत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला रॉयल्टीची विचारणा केल्यास रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना १:५२वाजता फोन करून माहिती दिली असता उपविभागीय अधिकारी यांनी पाठवतो असे उत्तर दिले मात्र बराच वेळ होऊनही कोणीही आले नसल्यानें पुन्हा फोन केला असता तहसीलदारांना सांगितलं मी बाहेर आहे असे सांगून लगेच फोन कट केला.
खुप वेळ होऊनही महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे कडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पोलीस विभागाच्या ११२ वर फोन करून माहिती दिल्याने वेळेने का होईना घटना स्थळी येऊन रॉयल्टी तपासणी केली तर रॉयल्टी वाळू घाट येथील दिवाणजी यांनी वेळेवर २. ४३ वाजताची वेळ टाकून पोलिसांना दाखविण्यात आले मात्र त्या वेळी ट्रक ड्रायव्हर पसार झाले होते. तर त्यावेळी ड्रायवर कडे रॉयल्टी असणे आवश्यक असतांना
वाळूघाटाच्या दिवाणजी कडे रॉयल्टि आली कशी काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला.

केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ च्या सदस्यांनी घटनास्थळी जेव्हा ट्रॅक ड्रायवर यांना रॉयल्टी बाबत विचारणा केली तेव्हा १:५० वाजले होते तर रॉयल्टी ही २.४३ ची वेळ नोंद केलेली आले.
सदर प्रकरण थांबविण्यात यावे या बाबत केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरीचे सदस्य यांचेवर दबावही येत होते .
तर घटनास्थळी कर्तव्यावर असलेले एक पोलीस कर्मचारी असेच सी. आय. डी .चे काम कराल तर एक दिवस फसाल असे धमकी वजा उपदेश केला असल्याने सदर पोलीस कर्मचाऱ्याची कर्तव्य हेच काय असा गंभीर प्रश्न यावेळी निर्माण झाला.

(विशेषतः ट्रॅक हा ON DUTY NMC घन कचरा व्यवस्थापन असे लिहलेले प्रिंटेड पाम्लेट लावलेला असातांना वाळूची वाहतूक कशी काय सुरू आहे. हे तपासण्याची गरज असून घनकचरा व्यवस्थापन शी संबंधित विभागाने कार्यवाही अपेक्षित आहे.)

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment