Ads

काँग्रेसने नोंदवला केंद्र सरकारचा निषेध सोनियाजी गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

चंद्रपूर :- काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीची नोटीस बजावली. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. २२) दुपारी ४ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सोनियाजी गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.Congress protested against the central government
Movement in support of Soniaji Gandhi
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहे. विरोधकांना संपविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करू लागले आहे. यातून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोदी सरकारविरोधात संपात व्यक्त होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाने याविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार विभागीयस्तरावरील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे.
आता प्रत्येक जिल्हास्थानावर मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्याचे निर्देश आले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी, लोकशाही प्रधान देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या मोदी सरकारचे दिवस भरत आले आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यावर उपाय शोधण्याचे सोडून केंद्र सरकार केवळ विरोधकांना टार्गेट करीत केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रकार सुरू केला असल्याचा आरोप केला.
त्यानंतर काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीसुद्धा मोदी सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. मोदी सरकारने सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांना ईडीच्या माध्यमातून त्रास देणे बंद करावे. अन्यथा देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवा राव, कामगार नेते के. के. सिंग, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रमजान अली यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment