Ads

सेन्ट्रो कारने गायींना दिली जोरदार धडक

घुग्घुस:- चंद्रपूर मार्गावर शुक्रवार, २९ जुलै रोजी रात्री ८:३० वाजता सचिन बारसमोर भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात पांढऱ्या सेन्ट्रो कारने दोन गायींना धडक दिली car hit two cows. ही धडक एवढी जोरदार होती की कारचा समोरचा मडगार्ड तुटून दोन्ही गायी गंभीर जखमी झाल्या.The cows were seriously injured.
परंतु अज्ञात कार चालक गाडीसह पळून गेला.लोकांनी गाडीचा नंबर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही. घुग्घुस येथील नागरिकांनी पशुवैद्यकांना फोन केला, पत्रकाराने पोलिसांना माहिती दिली, डॉक्टरांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक व्यवस्था केली आणि डॉक्टरांनी गायींची तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनमध्ये लवकर जाण्यास सांगितले. लोकांनी आपापसात पैसे जमवून मालवाहू वाहनाची व्यवस्था केली आणि पत्रकार व कुलदीप इंगोले यांनी चंद्रपूरला जाऊन दोन्ही गायींना रुग्णालयात दाखल केले.वसुल झालेल्या पैशांपैकी चार शे ड्रायव्हरला व बाकीचे डॉक्टरला दिले.पण त्यांनी नकार दिला. येथे जनावरांची मोफत सेवा केली जाते, असे सांगून पैसे घेण्यासाठी पत्रकाराने उरलेले पैसे संस्थेच्या दानपेटीत टाकले. हे पाहून चालकानेही चारशे रुपये घेऊन दानपेटीत टाकले व माझ्या वतीने गायींच्या सेवेत काही योगदान द्या असे सांगितले.दोन्ही गायींची प्रकृती आता बरी आहे.घुग्घुस येथील नागरिकांनी मिळून माणुसकी दाखवून गायींना वाचवले. दोन गायींचा जीव वाचवताना माणसानं.. बघून समजलं की माणुसकी अजून जिवंत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment