Ads

वरोरा येथे विविध सामाजिक संघटने तर्फे डॉ. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण

वरोरा : भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांच्या ७ व्या स्मृतिदिनी त्यांना विविध सामाजिक संघटने तर्फे येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकात आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे उप सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे हे होते. मुख्य अतिथी कार्यक्रमात वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राव राठोड, नगर परिषदेचे माजी सभापती तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कुमी तजिम छोटुभाई शेख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत खापने, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे आबाजी देवाडकर अध्यक्ष पेन्शनर संघ वरोरा, जेष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे, निबुदे जी जिल्हाध्यक्ष जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्था पत्रकार तथा आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने, अनिल झोटिंग माजी उपाध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे सागर कोहळे, प्रवीण चिमूरकर, माजी नगरसेवक सनी गुप्ता लोंढे गुरुजी पाल सर. मोहसीन पठाण परदे जी प्रमोद निकाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कावळे म्हणाले की, एक गरीब परिवारातील मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचे राष्ट्रपती असा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवणप्रवास थक्क करणारा आणि तितकाच विद्यार्थ्यांना व तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात गमे म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार युवापिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. छोटुभाई यांच्या पुढाकाराने विविध संघटनेच्या माध्यमातून डॉ. कलाम चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी डॉ. हेमंत खापने, राजेंद्र मर्दाने, अध्यक्ष पेन्शन संघ देवाडकर, मारोतराव मगरे, सागर कोहळे यांनी डॉ. अब्दुल कलाम याच्या जीवनावर प्रकाश टाकला.
सुरुवातीला मान्यवरांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या तैलचित्रावर पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तदवतच् दौन मिनट मौन धारण करून डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन छोटुभाई यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमात ....विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वश्री.राकेश सोनानी,... आदींची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment