Ads

सिंदेवाही शहरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही:- शहरातील महाकाली प्लायवूड च्या दुकाना जवळ एका अनोळखी व्यक्तीच्या मृतदेह
Dead body of a stranger शनिवार दि. 30 जुलै दुपारी दोन वाजता चा सुमारास आढळून आला.
सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर- नागपूर मार्गावरील सिंदेवाही शहरातील महाकाली प्लायवूड च्या दुकाना जवळ शनिवारी दि. 30 जुलै दुपार चा सुमारास रस्त्याच्या बाजूला एका व्यक्तीच्या मृतदेह आढळून आला. याची माहिती शहरातील नागरिकांनी पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले असून घटनास्थळाच्या पंचनामा करून मर्ग क्रमांक 30/ 2022 नोंद करून मृतदेह आपल्या ताब्यात घेतला पण त्या मृतदेहा ची ओळख काही पटली नसून ते चंद्रपूरच्या शीतगृहामध्ये ठेवण्यात आले आहे . त्या इसमाने निळ्या कलरच्या शर्ट, जीन्स घातला असून वय अंदाजे 45 वर्षे दरम्यान आहे असे पीएसआय बळीराम गेडाम यांनी सांगितले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment