Ads

देशात पहिल्यांदा आदिवासी महिलेला राष्ट्रपती म्हणून निवडून देण्याचा मान हा भारतीय जनता पक्षालाच जाईल

चंद्रपूर:- देशात पहिल्यांदा आदिवासी महिलेला राष्ट्रपती म्हणून निवडून देण्याचा मान हा भारतीय जनता पक्षालाच जाईल असे प्रतिपादन भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केले आहे.
यावेळी आपले विचार व्यक्त करतांना कोलावार म्हणाले की द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास म्हणजे एक साधारण शिक्षिकेपासून तर देशाचा प्रथम नागारिक असलेल्या राष्ट्रपतीपदापर्यंत
पोहचण्याइतका अविस्मरणीय आहे.ही बाब सर्व सामान्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी या गावातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीत झाला.इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून त्यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली.त्यानंतर ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या.नंतरच्या काळात त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.

त्यानंतर आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात नगर पंचायतीच्या एक नगरसेविका म्हणून करुन पुढे आमदार, राज्यमंञी,झारखंडच्या राज्यपाल पर्यंत मजल-दरमजल गाठली आहे.
तसेच पक्ष संघटनेत त्या भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले असून आज त्या देशाच्या प्रथम आदिवासी महामहिम राष्ट्रपती म्हणून विराजमान होत आहेत ही बाब निश्चितच आपल्या देशासाठी गौरवाची आहे अशी भावना महेश कोलावार यांनी यावेळी व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment