Ads

कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रात रस्त्याची ऐसी तैसी

ब्रम्हपुरी :-नागरिकांना स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न पाहणे सहज आहे तर तसे स्वप्न दाखवत, शहराच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असल्याचे शब्द देतं प्रसंगी मुद्रंकावर लेखी आश्वासन सुद्धा देतं नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करणाऱ्या कुर्झा वार्डातील मातब्बर राजकारण्यांच्या क्षेत्रातुन रात्र भर सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करी व इतर मोठं मोठ्या भरधावं वाहणाच्या वर्दळीने वार्डातील मुख्य रस्त्याची मोठी दैनावस्था झालेली आहे.
राजकारणात मोठा वजन व आर्थिक बाजू भक्कम असलेल्या उमेदवारांना मतदार राजा निवडणुकीच्या पटलावर बरेचदा "अर्थकारणाने" प्राधान्य देतं एकहाती सत्ता देतं असल्याचे शहरातील राजकारणात नेहमीच दिसून येते.
सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात असलेला त्यांचा तोरा व भक्कम आर्थिक बाजूने सर्वसाधारण मतदारांना भुरळ पाडत साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर सत्ते साठी करतांना आढळून येतात. सत्ता येते मात्र सर्वसाधारण नागरिकांच्या अपेक्षेचे, त्यांच्या भागातील विकासाचे, दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडत पुढील पाच वर्ष नागरिकांना "वनवास" झाल्याचा अनुभव मात्र नक्की येतो.

जुना पुराना डांबराचा असलेल्या शहरातील कुर्झा वार्डातील मुख्य रस्ता व समता कॉलनी कडे जाणाऱ्या मार्गाची क्षमता आणि त्यावर धावणाऱ्या भरधावं वाळू टिप्परचा लोड यात चार /पाच पट मोठी तफावत असून सुद्धा ओके सिग्नल मिळत असल्याने हजारो लोकांच्या जाण्या येण्या साठी असलेल्या मार्गाची झालेली दुरव्यवस्था व दुरुस्ती ची जबाबदारी कुणाची..?या प्रश्नात आता स्थानिक नागरिक गुंतले असून नागरिकांच्या मार्गात आलेला रस्त्याच्या गुंतवळ्याचा गंभीर विषय स्थानिक मातब्बर लोकप्रतिनिधी सोडवणार अथवा वाढवणार हे आता येणारा काळचं ठरवेल. तर भविष्यात मतदार राजा जागृत होतं विकासाचे सारथी म्हणून स्वतःपुढाकाराने योग्य उमेदवारला पसंत करीत नगर परिषद सभागृहामध्ये त्यांचे नेतृत्व व विकास कामे करण्यास धाडतील हे नाकारता येणार नाही.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment