Ads

शेतमजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहनाला अपघात ; ४३ शेतमजुर जखमी

चंद्रपूर : शेतमजूराना घेऊन निघालेले पिकअप वाहन उलटले. यात 43 मजूर जखमी झाले आहेत. ही घटना चिमूर तालुक्यातील गोदेंडा खांबाळा मार्गावर आज घडली. (#Farmer's #vehicle #overturned 43 #injured ) या घटनेत सूदैवाने जिवीतहाणी झालेली नाही. जखमींना
उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.MH34-AV-1208
जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला गती आली आहे. मजूरांची कमतरता असल्याने पिकअप, ऑटोने शेतमजूरांना आजूबाजूच्या गावातून शेतात शेतकामाकरिता मजुरीने नेल्या जात आहे. चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजुर गोंदेडा खांबाडा मार्गावरील मनोज वाघे यांचा शेताकडे घेऊन जात असातांना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला वाहन उलटले.
या वाहनात 43 मजूर होते. अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजुर धावून गेलेत. वाहनात दबलेल्या जखमींना त्यांनी बाहेर काढले. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातात 19 शेतमजुर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोड जखमी झाले आहेत. जखमींवर नेरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment