Ads

अवैध बांधकाम तक्रार परत घेण्याकरिता 5 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मानवाधिकार संघटनेच्या 3 जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

चंद्रपूर :-धमकावून 5 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मानवाधिकार सुधारणा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 3 जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सदलावार, उपाध्यक्ष शेखर निषाद आणि सचिन नारंजे यांचा समावेश आहे. बालाजी वॉर्डातील रहिवासी सुयश भुसारी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती या प्रमाणे आहे रामाला तलाव जवळ सुयश भुसारी यांचं जीर्ण अवस्थेत असलेले जुने घर होते, त्या जीर्ण घराला पाडत नवीन बांधकाम भुसारी यांनी सुरू केले होते. Extortionist
मात्र एकदिवस अचानक चंद्रपूर मनपा द्वारे घराचे काम बंद पाडण्यात आले, व बांधकाम संबंधी कागदपत्रे मनपात येऊन दाखविण्यासंदर्भात नोटीस दिले. Human Rights Research Association

भुसारी हे मनपात गेले असता लिपिकाने त्यांना सांगितले की शेखर निषाद या व्यक्तीने तुमच्याविरोधात तक्रार दिली आहे. भुसारी यांनी निषाद यांची भेट घेतली असता ते म्हणाले की तुमचे बांधकाम अवैध स्वरूपाचे आहे. आम्ही मानवाधिकार संशोधन असोसिएशन संघटनेचे आहोत मी स्वतः असोसिएशनचा जिल्हा उपाध्यक्ष असून योगेश सादलावार आमचे अध्यक्ष आहे, जर बांधकाम पूर्ण करायचे असतील तर आम्हाला 5 लाख रुपये द्या, पैसे दिल्यावर लगेच तक्रार परत घेऊ.

भुसारी यांची पैसे देण्याची इच्छा नव्हती, मात्र मानवाधिकार असोसिएशनचे योगेश सादलावार, सचिन नरांजे व शेखर निषाद यांनी भुसारी कडे पैश्याचा तगादा लावला, पैसे द्या नाहीतर बांधकाम पाडत सील लावण्यात येणार अशी धमकी भुसारी यांना देण्यात आली.

भुसारी यांनी यासंदर्भात शहर पोलीस स्टेशन गाठत तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम 384, 385 व 34 अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment