Ads

विनयभंग करनार आरोपी बापास ३ वर्ष शिक्षा.

चंद्रपुर :-पोलीस स्टेशन तळोधी परिसरातील मौजा- सावरकर येथील आरोपी व पीड़ित मुलगी हे नात्याने बापलेक असून विनयभंग करणार आरोपीस दिनांक २०/०७/२०२२ रोजी मा. श्री. अनुराग दिक्षित सा. सत्र न्यायधीश न्यायालय, चंद्रपुर यांनी ३ वर्ष कारावसाची शिक्षा व २००० रु. दंडाची शिक्षा सुनावली.3 years imprisonment for molestation accused.
घटना ता. वेळी व ठिकाणी फिर्यादिची अल्पवयीन मुलगी व आरोपी हे नात्याने बापलेक असून अरोपिने पिडीतेचा घरी कोनीही नसताना विनयभंग केला. अशा फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट वरून अप.क्र. २८५ / २०२० कलम- ३५४ (अ), ३५४ (ब) भा.द.वि. व सहकलम ८, ९, (एन), १०पोक्सो कायदा चा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरचा गुन्हा तपासात घेतल्यावर तपास अधिकारी महिला सपोनि. पूनम पाटिल व महिला पो.उपनि, चंदा दंडवते यांनी आरोपी निष्पन करुन पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.

न्यायालयाचे सुनावनी दरम्यान सदर प्रकरणात साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक २०/०७/२०२२ आरोपी यास मा. न्यायालयाने कलम ३५४ (अ) १ (आय) भा.द.वि. व सहकलम ८ पोक्सो कायदा मध्ये ३ वर्ष सजा व २००० रु.दंड दंड न भरल्यास ४ महीने सजा मा. श्री. अनुराग दिक्षित सा. सत्र न्यायधीश न्यायालय, चंद्रपुर यांनी सुनावली आहे. सदर प्रकरण मध्ये स्वाती देशपांडे सरकारी वकील आणि कोर्ट पैरवी ना. पोअं. १११६ विजय वाकडे पो.स्टे. तळोधी यांनी काम पाहिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment