Ads

बर्थडे कॅंन्डलच्या स्फोटात १० वर्षीय बालक गंभीर जखमी

ब्रम्हपुरी:-वाढदिवसाच्या निमित्ताने केकवर लावलेली फवारे उडविणारी मेणबत्ती एक १० वर्षीय बालक हातात पकडून असतांना तीचा अचानक स्फोट झाला.10-year-old boy seriously injured in birthday candle explosioncha त्यात त्या बालकाचा उजवा गाल पुर्णतः फाटुन छिन्नविछिन्न झाला. त्यानंतर त्याला ब्रम्हपुरी शहरातील आस्था रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डाॅक्टरांच्या चमुने त्या बालकावर प्लास्टिक सर्जरी करून ३०० च्या जवळपास टाक्यांची तब्बल ५ तासांची यशस्वी शस्त्रक्रिया करीत त्या बालकाला सुस्थितीत पुर्ववत आणले आहे.
चिमुर तालुक्यातील भीसी येथील रहिवासी असलेले विनोद डोंगरे हे आपल्या पत्नी व १० वर्षीय मुलासह मित्राच्या घरी असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा सायंकाळी ६ वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. केकवर असलेली फवारे उडवणारी मेणबत्ती पेटविण्यात आली. व मेणबत्तीवर फुंकर घालून विझविण्यात सुध्दा आली. केक सुध्दा कापून झाला. केकवर लावली असलेली फवारे उडविणारी मेणबत्ती केकवरून काढून बाजूला फेकण्यात आली. तेव्हा कार्यक्रमात गेलेले विनोद डोंगरे यांचा १० वर्षीय मुलगा आरंभ याने ती फवारे उडविणारी मेणबत्ती आपल्या हातात पकडली असता तिचा स्फोट झाला. स्फोटाची भीषणता एवढी होती की, त्यामध्ये गोपी याचा उजवा गाल पुर्णतः फाटुन छिन्नविछिन्न अवस्था झाली. गालातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तेव्हा कुठल्या रुग्णालयात दाखल करायचे हा प्रश्न असतांना त्यांच्या नातेवाईकांनी भीसी येथून ५० किमी अंतरावर असलेल्या ब्रम्हपुरी येथील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. बालकाला ब्रम्हपुरी शहरातील आस्था रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करून त्याचा छीनवीचीछन्न अवस्थेतील फाटलेला गालाचा भाग आणि जीभ जोडण्यात आली. गालावर तब्बल ३०० च्या जवळपास टाके मारण्यात आले. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ब्रम्हपुरी शहरात ही शस्त्रक्रिया पहील्यांदाच पार पडली आहे. सदरची शस्त्रक्रीया प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमीत जयस्वाल, डॉ. पंकज लडके यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.याबाबत प्रस्तुत प्रतीनीधीने बालकाच्या आईवडीलांशी चर्चा केली असता त्यांनी अतिशय भावुक होऊन आस्था रुग्णालयात त्यांच्या मुलावर झालेल्या योग्य उपचाराबाबत समाधान व्यक्त करीत रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.
सोबतच मुलाचे वडील हे एका फांउडेशन मध्ये कार्यरत असुन त्यांची आर्थिक स्थिती बघता डाॅक्टरांनी योग्यदरात शस्त्रक्रिया करून बालकावर उपचार केला आहे.
*पालकांनी घ्यावी काळजी
वाढदिवस अथवा इतर समारंभात स्फोटक साहित्याचा वापर करत असतांना त्या स्फोटक साहीत्यांपासुन बालकांना नेहमी दुर ठेवले पाहिजे.*
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment