Ads

05 वर्ष निःस्वार्थ जनसेवा पुस्तिकेचे प्रकाशन थाटात साजरा

घुग्घुस:- राजकारणात राहून समाज कार्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात तसेच शहरात वेगळीच ओळख निर्माण करणाऱ्या घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या कार्याची झलक दाखविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन 08 जुलै रोजी स्नेहप्रभा मंगल कार्यालयात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळेजी, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर, तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे, रोशन पचारे किसान जिल्हाध्यक्ष, पवन आगदारी माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, जयंता जोगी,मुन्ना भाई लोहनी,बाबा भाई कुरेशी, शामराव बोबडे,मधुकर मालेकर अध्यक्ष सत्यशोधक गुरुदेव सेवा मंडळ, शोभा ताई ठाकरे,रामपाल वर्मा,अनिरुद्ध आवळे,अलीम शेख ,स्टीवन गुंडेटी, तिरुपती महाकाली, सूरज कन्नूर युवा नेते, विज्या बंडीवार शहर अध्यक्ष,किशोर बोबडे,बाबा आमटे,भीमराव कोकरे, यांच्या हस्ते उत्साहात पार पडला गटा - तटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेस पक्षाचे आजी माजी सर्वच पदाधिकारी एकाच मंचावर उपस्थित झाल्याचे सकारात्मक चित्र कालच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले
काँग्रेसची मोट एकत्रित बांधल्याची किमया राजूरेड्डी यांनी पार पाडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते.
Celebrating 05 years of selfless public service booklet inauguration
कार्यक्रमवेळी रोशन पचारे यांनी आपल्या संबोधनात भाजप नेत्यांना चांगलेच धारेवर धरले शहराचा विकास साधण्याच्या नावावर स्वतः चा विकास साधणाऱ्यानी शहरातील शासकीय इमारत प्रयास च्या माध्यमातून जनतेची लूट सुरू केली आहे.
तसेच पोलीस वसाहतीची जागेवर अवैध रित्या अतिक्रमण केले असून नगरपरिषद निवडणुकीत निवडून आल्यास संपूर्ण शहरच गिळकृत करतील असा घणाघाती हल्ला चडविला
श्यामकांत थेरे यांनी रेड्डी यांच्यावर पुस्तक नाही तर ग्रंथ लिहला जावू शकतो अश्या शब्दात रेड्डी यांच्या कार्याचा गौरव केला.
नम्रता ठेमसकर यांनी पाणी वाटप कार्याची स्तुती केली तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली होवू घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला बहुमताने विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी सौ.संगीता बोबडे,सौ.पुष्पा नक्षिणे,पद्मा त्रिवेणी,संध्या मंडल,अमिना बेगम,दुर्गा पाटील,यास्मिन सैय्यद,सरिता गोरकर,माधुरी ठाकरे,सरस्वती कोवे, मंगला बुरांडे, रेखा रेगुंडवार,शेख शमिउद्दिन,गणेश उईके,अजय उपाध्ये, शहजाद शेख,थॉमस अर्णाकोंडा,श्रीनिवास गुडला,विजय माटला,ताज अस्लम शेख,रमेश रूद्रारप,किरण पुरेल्ली,देव भंडारी,अनुग्रह कलेपल्ली,हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोशन दांतलवार,नुरूल सिद्दीकी,विशाल मादर,इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,कपिल गोगला,दीपक पेन्दोर,अंकेश मडावी,विशाल प्रदीप आसेकर,संजय सोनेकर,सुनील पाटील,आरिफ शेख, बालकिशन कुळसंगे,रंजीत राखुंडे,कुमार रुद्रारप,विशाल नागपुरे,यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन साहिल सैय्यद यांनी तर आभार प्रदर्शन अनिरुद्ध आवळे यांनी केले
घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment