Ads

महाअधिवेशनाला हजारो ओबीसी बांधव जाणार : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : विदर्भ प्रांतातून विविध जिल्ह्यांमधून हजारों ओबीसी बांधव दिल्ली येथील ओबीसी obc महाअधिवेशनाला जाणार असल्याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे Dr. Ashok Jiwatode यांनी सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२२ ला न्यू दिल्ली Delhi येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे आयोजित केले आहे. या महाअधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसीं महासंघाच्यावतीने सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा घेण्यात आली.

या अधिवेशनाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे Dr.Babanrao Taivade यांचे अध्यक्षते खाली व समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांचे उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन आज (दि. १९) ला दुपारी १ वाजता श्री. लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालयात येथे करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष डॉ. सुधाकर जाधव, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रदीप वादाफळे युवा अध्यक्ष सुभाष घाटे, सहसचिव शरद वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, गुणेश्वर आरिकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ, युवा अध्यक्ष चेतन शिंदे, मनोज चव्हाण, महिला महासंघाचे सुषमा भड, रेखा बाराहाते, कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, विध्यार्थी संघटनेचे रोशन कुंभलकर आदी उपस्थित होते.

डॉ. बबन तायवाडे यांनी ओबीसी समाजाची दशा व दिशा यावर यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सचिन राजूरकर यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार प्रदर्शन रजनी मोरे यांनी केले. यावेळी विदर्भातून मोठ्या संख्येत ओबीसी बांधव बैठकीला उपस्थित झाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment