Ads

हा विजय तर पक्का होता,सत्याचा होता,होणारच होता

चंद्रपूर:-हा विजय तर पक्का होता,सत्याचा होता,होणारच होता असे वक्तव्य भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी केले आहे.
काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीच्या निकालासंदर्भात महेश कोलावार आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की भाजपच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय होणे यात काही नवल नाही,हा विजय तर होणारच होता व सत्याचाही होता.
आघाडी सरकार वारंवार केंद्र सरकारवर हल्लाबोल केला व सामान्य जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल रोष निर्माण करण्याचे कृती केले.तरीही भारतीय जनता पक्षानी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणूकीत बाजी मारली.परत एकदा या निकालाने राज्यसभेसारखीच विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती झाली.
सामान्य जनतेच्या विश्वासासोबत पक्षाच्या आमदारांचीही साथ देवेंद्र फडसवीसांसोबत असल्यामुळे हा विजय केवळ विधान परिषदेचाच नव्हे तर हा विजय देवेंद्र फडणवीसांवर दाखवलेल्या आमदारांचा विश्वासाचा आहे असे भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी यावेळी म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment