Ads

भद्रावती तालुका सरपंच संघटनेच्या उपोषणाला यश

भद्रावती ता.:-भटाळी येथील सरपंच सुधाकर रोहणकर यांच्या नेतृत्वात भद्रावती ग्राम संवाद सरपंच संघटनेने दि.९पासुन वरोरा येथील विज वितरण कंपणीच्या उपविभागीय कार्यालयासमोर सुरु केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला यश प्राप्त झाले असुन विज वितरण कंपणीतर्फे तालुक्यातील ६५ग्रामपंचायतीचा कापण्यात आलेला विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला आहे. आता या ग्रामपंचायतींचे सर्व थकित विज बिल राज्य शासनातर्फे भरण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुधाकर रोहणकर यांनी दिली आहे.
थकित विज बिल न भरल्यामुळे तालुक्यातील ६५ग्रामपंचायतींचा विज पुरवठा विज वितरण कंपणीकडून कापण्यात आल्याने या सर्व गावातील गावकरऱ्यांना गेल्या दहा दिवसांपासून अंधारात राहण्याची पाळी आली होती. शासन जोपर्यंत थकित विज बिल भरीत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतींचा विज पुरवठा सुरु करावा अशी सरपंच संघटनेची मागणी होती.मात्र,या मागणीकडे विज वितरण कंपणीने दुर्लक्ष केल्यामुळें सरपंच संघटनेने कंफणी विरोधात बेमुदत आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले होते त्याला यश मिळून या ६५ग्रामपंचायतीचा विज पुरवठा सुरु करण्यात आला. दरम्यान या उपोषणाला खा.बाळु धानोरकर,अड.मोरेश्वर टेंमुर्डे व अन्य राजकीय नेत्यांनी भेटी देऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या होत्या.
सदर बेमुदत आमरण उपोषणाला यशस्वी करण्यासाठी भद्रावती तालुका ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या सर्व पदाधिकारी तथा सदस्यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment