Ads

शहरातील मुस्लिम कब्रस्थानात हायमास्ट लावण्यासाठी मुस्लिम समाजाचे नगर पालिकेला निवेदन

भद्रावती ता. जावेद शेख प्रतिनिधी:-
शहरातील मुस्लिम कब्रस्तानात हायमास्ट लाउन तिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी यासाठी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने नगर पालिकेला एक निवेदन सादर करण्यात आले. पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अनील धानोरकर व मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर यांनी सदर निवेदन स्विकारले.
यावेळी माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी व नगरसेवक वानखेड़े उपस्थित होते. मुस्लिम कब्रस्तान शहरातील एका बाजुला असुन आजुबाजुला वस्ती नसल्याने येथे रात्रौच्या वेळेस पुरेसा प्रकाश नसतो. पावसाळ्याच्या एखाद्या वेळेस एखाद्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचा असल्यास अपुऱ्या प्रकाशामुळे अडचणी येतात त्यामुळे या ठिकाणी हायमास्ट लाउन येथे पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करतांना नगरसेवक हाजी जावेद शेख,हाजी जाकिर भाई,हाजी अब्बास भाई, जफर शेख, हाजी शाहिद अली,शाहिद ईकबाल कुरैशी आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment